जिल्ह्यात आज सकाळी आलेल्या अहवालानुसार १२ कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही १८८०१ वर जाऊन पोहचली आहे.
जिल्ह्यातील आतापर्यंत आढळून आलेल्या १८८०१ कोरोनाबाधितांपैकी आतापर्यंत १३८८४ जण बरे झाले तर आजपर्यंत ५८९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या ४३२८ रुग्णांवर उपचार सुरु आहे.
या भागात आढळले १२ रुग्ण
आज सकाळी पहिल्या टप्प्यात आलेल्या कोरोनाच्या अहवालात १२ रुग्णांची वाढ झाली आहे. त्यात ग्रामीण भागात जामगाव रोड, गंगापूर-७, विठ्ठल मंदिर परिसर, गंगापूर -१, पाण्याच्या टाकीजवळ, सिल्लोड-१ तर शहरात बन्सीलालनगर-१, पोलिस कॉलनी, मिल कॉर्नर-१, सातारा परिसर-१ या भागातील रुग्ण आढळून आले आहेत.
दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू
एका खासगी रुग्णालयात रांजणगाव, वाळूज येथील २७, त्रिमूर्ती चौक, बजाज नगरातील ८५ वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.